कांदीवलीच्या समतानगर येथील ठाकूर व्हिलेजमधील वॉर्ड क्रमांक 25 येथे वातानुकुलित शौचालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. नगरसेविका माधुरी पुरी यांच्या निधीतून हे शौचालय बांधण्यात आले असून, याचा फायदा परिसरातील जवळपास 20 हजार लोकांना होणार आहे.शौचालयाच्या उद्घाटनाला करमणुकीच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, अशाच 3 वातानुकुलित शौचालयांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका माधुरी पुरी यांनी दिली.
निवडणुका असल्यामुळे या शौचालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रखडून राहिला होता. योगेश भोईर काँग्रेसमध्ये असताना या शौचालयाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अचानक त्यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेत जाणं पसंत केल्यामुळे या उद्घाटनाला विलंब झाला.