Advertisement

असं काय घडलं की पठ्ठ्यानं चक्क दुचाकीचं स्मारक उभारलं

स्मारकात गणेश मूर्तीची स्थापना करून त्यानं हा आगळा-वेगळा देखावा उभारला असून त्यावर आपली दुचाकी ठेवली आहे.

असं काय घडलं की पठ्ठ्यानं चक्क दुचाकीचं स्मारक उभारलं
SHARES

पुणेरी पाट्या म्हणजे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय. याच पाट्यांच्या माध्यमातून एका पुणेकरानं ट्रॅफिक पोलिसांचा निषेध केला आहे. त्यासाठी त्यानं चक्क त्याच्या दुचाकीचं स्मारक उभारलं आहे.

या स्मारकात गणेश मूर्तीची स्थापना करून त्यानं हा आगळा-वेगळा देखावा उभारला असून त्यावर आपली दुचाकी ठेवली आहे.

सचिन धनकुडे नावाची ही व्यक्ती असून जून महिन्यात ट्रॅफिक पोलिसांनी उचललेली गाडी ८० दिवसांनंतर परत केली. झालेल्या मनस्तापाचा निषेध करण्यासाठी सचिन धनकुडे यांनी हे स्मारक उभारल्याचं सांगितलं. स्मारक उभारल्यानंतर ट्राफिक पोलिसांनी ८० दिवसांनी त्यांना गाडी परत केली.

पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासोबतच आपली गाडी चूक नसताना उचलली असल्याचा देखील त्यांनी निषेध केला आहे.

कोथरूडच्या भुसारी चौकात त्यांनी हे स्मारक उभारलं. यासाठी त्यांनी मजूर आणि कारागीर बोलावले आणि १५ फूट उंचीचं स्मारक तयार केलं. एवढंच नाही तर या स्मारकावर त्यांनी आणखी एक दुचाकी क्रेनच्या साहाय्याने नेऊन ठेवलीय.

शिवाय या स्मारकाला तोरण आणि पाना - फुलांनी त्यांनी सजवल्याने येणारे - जाणारे थांबून या स्मारकाकडे पाहत आहेत. स्मारकाच्या चारही बाजूला त्यांनी पुणेरी पाट्या लावल्या आहेत.

यामध्ये, ‘भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहे’, ‘पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘माँ ने कहा शराब छोड दो बाबुजीने कहा घर छोड दो, पीछे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो’, अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत.

सचिन धनकुडे यांनी सांगितल्याप्रमाणे, १५ जून रोजी नो पार्किंगच्या जागेत गाडी लावलेली नसताना देखील ट्रॅफिक पोलिसांनी गाडी उचलून नेली होती. त्यानंतर वाहतूक शाखेत जाऊन त्यांनी घडला प्रकार सांगितला. तरीदेखील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची दुचाकी परत दिली नाही.

शिवाय, या पोलिसांकडे नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याचा फोटो देखील नव्हता. अनेकदा पाठपुरावा करून देखील गाडी परत न मिळाल्यानं अखेर गणेशोत्सवाचं निमित्त साधून सचिन धनकुडे यांनी भुसारी कॉलनी मित्रमंडळातर्फे गाडीचं स्मारक हाच देखावा उभारला.

सचिन धनकुडेंनी या स्मारकाच्या आतमध्ये गणेशोत्सव सुरू असल्यानं गणपतीचीही प्रतिष्ठापना केली. संध्याकाळी एका क्रेनच्या साहाय्याने या स्मारकाच्या वर असलेली दुचाकी खाली काढून पुन्हा वरती ठेवण्याची कसरत ते करतात. या गणेशोत्सवातील हा हलता देखावा असल्याचा त्यांचा दावा आहे.

काही दिवसांपूर्वी सचिन धनकुडेंनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून काम करण्यासाठी निघून गेले. काही वेळाने ते जेव्हा परत आले तेव्हा गाडी जागेवर नव्हती. वाहतूक पोलीस गाडी चौकीला घेऊन गेल्याचं समजल्यावर ते चौकीत गेले आणि वादाला सुरुवात झाली.

आपली गाडी नो पार्किंगमध्ये नव्हतीच असा त्यांचा दावा होता. पोलीस मात्र मानायला तयार नव्हते. मग मात्र धनकुडेनमधला पुणेकर जागा झाला आणि त्यांनी कोथरूडमधील पौड रस्त्यावर भर चौकात आपल्या गाडीचं स्मारक करायचं ठरवलं.हेही वाचा

भायखळा प्राणीसंग्रहालयात २ पेंग्विन पिल्लांचा जन्म, 'ही' ठेवली नावं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा