Advertisement

मुंबईत १२ तासात आढळले २ अजगर


मुंबईत १२ तासात आढळले २ अजगर
SHARES

मुंबईत मागील १२ तासांत दोन अजगर आढळले अाहेत. यामधील एक अजगर ८.५ फुट लांबीचा हा वांद्रे कलानगर ब्रीजवर आढळला. तर, दुसरा ७.५ फुट लांबीचा अजगर ओपन थिएटरच्या परिसरात आढळला. हे दोन्ही अजगर सर्प मित्रांनी पकडून ठाण्याच्या वनविभागाकडे पाठविले आहेत.  मानवी वस्तीत अजगर घुसण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.पोलिसाच्या खुर्चीखाली अजगर

वांद्रे येथील  कलानगर ब्रीजवर रविवारी रात्री ११.०६ च्या सुमारास एक महिला पोलिस बंदोबस्तासाठी खुर्चीवर बसल्या होत्या. त्यावेळी या ब्रीजला लागून असलेल्या मिठी नदीतून एक अजगर त्यांच्या खुर्चीखाली येऊन बसला. मात्र, याबाबत त्यांना कल्पना नव्हती. एका कॉन्स्टेबलने त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्या महिला पोलिसांनी तातडीनं तेथून पळ काढला. खेरवाडी पोलिसांनी सर्प मित्रांना याची माहिती दिली असता सर्प मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगर पकडला. 


गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अजगर मानवी वस्तीमध्ये शिरत आहेत. मानवी वस्तीत अजगर शिरण्याला वाढते क्राँक्रिटीकरण आणि मुंबईत ठिकठिकाणी सुरु असलेल्या मेट्रोच्या खोदकामासाठी केलेले मोठ-मोठे खड्डे कारणीभूत अाहेत. त्याचप्रमाणं या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मशनरींच्या हादऱ्यामुळं हे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत अाहेत. 

- अतूल कांबळे, सर्प मित्र


अजगराची अंडी

सोमवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास दुसरा अजगर ओपन थिएटर्स येथे सुरु असलेल्या मेंकर मेंक सिटी या बांधकामाच्या ठिकाणी आढळला आहे. या अजगरानं या परिसरात अंडी घातली आहेत. परंतू ती अंडी सर्प मित्रांना मिळाली नसल्याची माहिती सर्प मित्र अतुल कांबळे यांनी दिली आहे.
हेही वाचा - 

पूर्व द्रुतगती मार्गावर ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या; मोठी वाहतूक कोंडी

26/11 स्पेशल: '२६/११ कसाब अाणि मी' पुस्तकातून उलगडणार कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा