Advertisement

रेल्वे फडकवणार ७५ स्थानकांवर राष्ट्रध्वज!

रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक काढलं असून या परिपत्रकात नमूद केल्यानुसार ज्या रेल्वे स्थानकांची वार्षिक कमाई ५० कोटी रुपयांहून अधिक आहे, अशा रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज लावण्यात येईल. स्थानकांवर लावण्यात येणारा राष्ट्रध्वज १०० फूट उंचीचा असेल.

रेल्वे फडकवणार ७५ स्थानकांवर राष्ट्रध्वज!
SHARES

मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवरील स्थानकांवर लवकरच तुम्हाला राष्ट्रध्वज फडकताना दिसणार आहे. केंद्र सरकारने ७५ सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज लावण्याचे आदेश रेल्वे बोर्डाला दिले आहेत. त्यानुसार हे राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत.


१०० फूट उंच

त्यानुसार रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक काढलं असून या परिपत्रकात नमूद केल्यानुसार ज्या रेल्वे स्थानकांची वार्षिक कमाई ५० कोटी रुपयांहून अधिक आहे, अशा रेल्वे स्थानकांवर राष्ट्रध्वज लावण्यात येईल. स्थानकांवर लावण्यात येणारा राष्ट्रध्वज १०० फूट उंचीचा असेल.


मुंबईत कुठली स्थानकं?

हे राष्ट्रध्वज ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत लावण्यात येईल. मुंबईत ७ ए-१ श्रेणीतील रेल्वे स्थानक आहेत. यांत सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांचा समावेश आहे.

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफाॅर्म क्रमांक १८ वर राष्ट्रध्वज फडकवण्यात येईल. तर ट्रेनच्या डब्यावर तिरंगा पेंट करण्याची योजना देखील रेल्वे आखत असल्याचं समजत आहे.



हेही वाचा-

१ डिसेंबरपासून सायन सर्कल उड्डाणपूल ४ महिन्यांसाठी बंद!

बामनडोंगरी, खारकोपर स्थानकावर पहिल्या दिवशी ३,०७२ तिकटांची विक्री



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा