Advertisement

रेल्वे प्रशासन झाले जागे, मुलुंड रेल्वे स्थानकालगतची अनधिकृत स्टॉल जमीनदोस्त


रेल्वे प्रशासन झाले जागे, मुलुंड रेल्वे स्थानकालगतची अनधिकृत स्टॉल जमीनदोस्त
SHARES

एल्फिन्स्टन चेंगराचेगरीनंतर जागे झालेल्या मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्या पाठोपाठच रेल्वे प्रशासनानेही अशाच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील एकूण ८ दुकानांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करत ही अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केली. त्यानंतर या दुकानचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.


प्रवाशांच्या तक्रारीनंतर फेरीवाल्यांवर कारवाई

हे आठ अनधिकृत फेरीवाले मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातच ठांड मांडून बसून होते. त्यामुळे रोज येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा मनस्ताप होत होता. प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाकडून या फेरीवाल्यांना सूचनापत्रक जारी केले होते. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना रेल्वे प्रशासनाने चर्चेसाठी देखील बोलावले होते. परंतु, दुकानचालक या चर्चेसाठी गैरहजर राहिले. अखेर रेल्वे प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती मुलुंड रेल्वेस्थानकाचे अधिकारी बरनवाल यांनी दिली. पण आता याबाबतीत न्यायालय नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.



हेही वाचा - 

'सवयी बदला मुंबई बदलेल' दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी

दादरकर म्हणताहेत, फेरीवाला हटाव, पण राडा नको!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा