Advertisement

परतीच्या पावसाचा मुंबईकरांना फटका?

सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असलं तरी हवामानात होणाऱ्या चढ-उतार आणि बदलांचा मुंबईकरांना मात्र फटका बसणार आहे

परतीच्या पावसाचा मुंबईकरांना फटका?
SHARES

मुंबईत ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. एकिकडे ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत. तर दुसरीकडे राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसांमध्ये मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे. सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासास हवामान अनुकूल असलं तरी हवामानात होणाऱ्या चढ-उतार आणि बदलांचा मुंबईकरांना मात्र फटका बसणार आहे.

उकाडा वाढणार

हवामान खात्यानुसार, मुंबईत हवामान कोरडेच राहिल. मात्र काही भागात हलक्या सरी बरसतील. चक्रवाती परिस्थितीमुळे ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हवेतील आद्रतेत भर पडून आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्याचा अंदाज

८ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ९ ते १० ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पाऊस पडेल. ११ ऑक्टोबरला देखील कोकण, गोव्यात, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.


संबंधित विषय