Advertisement

सोमवारी पडलेल्या पाऊसाने मुंबईत ८ ठिकाणी झाडे पडली

सुदैवाने या सर्व नैसर्गिक दुर्घटनेत कोणती ही जिवीत हानी झालेली नाही.

सोमवारी पडलेल्या पाऊसाने मुंबईत ८ ठिकाणी झाडे पडली
SHARES

मुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईत सोमवारी शहरात कुलाबा येथे ११.२ मीमी पाऊस तर सांताक्रूझमध्ये ३७.० मीमी पावसाची नोंद ही सायंकाळी ५.३० पर्यंत करण्यात आली आहे. तर दिवसभरात अंधेरी परिसरात पडलेल्या पावसामुळे पाणी साचल्याने तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर ८ ठिकाणी झाडे पडल्याची व २ ठिकाणी शाँर्ट सर्किट झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- एकाच दिवसात ५ हजार जणांनी केली कोरोनावर मात

मुंबईवर आधीच कोरोनाचे सावट असताना वेळोवेळी पाऊस हा परीक्षा घेत आहे. मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे तासभर का होईना पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. या परिसरात ६० मीमी इतका पाऊस झाल्याने सब वे मध्ये पाणी साचले होते. त्यामुळे तासभर वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला होता. त्यानंतर येथील पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचाः- कोरोनामुळे घेतला 'हा' निर्णय, चिंतामणीची १०० वर्षांची परंपरा खंडित

तर सोमवारी पडलेल्या पावसात ८ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात शहरात २, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ५  झाडं पडल्याची नोंद करण्यात आली आहे. पावळ्यात शहरात अनेक ठिकाणा शाँर्ट सर्किटच्या ही घटना घडत असतात, सोमवारी मुंबईत २ ठिकाणी शाँर्ट सक्रिटच्या घटना घडल्या असून त्यात शहरात १ तर पश्चिम उपनगरात १ घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. माञ सुदैवाने या सर्व नैसर्गिक दुर्घटनेत कोणती ही जिवीत हानी झालेली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा