Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याचं योग्य नियोजन- डॉ. राजेंद्र शिंगणे

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने तसंच रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

राज्यातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याचं योग्य नियोजन- डॉ. राजेंद्र शिंगणे
SHARES

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने तसंच रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

समप्रमाणात वितरण

अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचं विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-२९.४.२०२१ साठी १६३६ टनाचं विवरणपत्र देण्यात आलेलं आहे. याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या ५ प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचं देखील उत्पादन वाढलं आहे. या सर्व उत्पादकांचं मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र २४ एप्रिल, २०२१ द्वारा १७८४ टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे.

राज्यात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटक व गुजरात राज्यांमधून सुद्धा साधारणत: २०० ते २५० टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वेच्या माध्यमातून २४ एप्रिल, २०२१ रोजी १०५ टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.

राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टँकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टँकर यांचं ऑक्सिजन टँकरमध्ये रूपांतर करणं सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत ६८० टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून ३५० ते ४०० टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२७ एप्रिल, २०२१ रोजी राज्यात एकूण १५५६ टन ऑक्सिजनचं वितरण झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा- जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता?

रेमडेसिवीरचा साठा वितरणासाठी उपलब्ध

रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे.सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येतं. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचं उत्पादन होतं.

वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो. केंद्र शासनाचे पत्र २४/०४/२०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण ४,३५,००० रेमडेसिवीरचा साठा २१/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ या कालावधीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार दि.२१/०१/२०२१ ते २८/०४/२०२१ अखेर पर्यंत २,९८,०२४ इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना करण्यात आला आहे. पुढील कालावधीत उर्वरित साठा प्राप्त होणं अपेक्षित आहे. २८/०४/२०२१ रोजी राज्यात २८९४५ इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक- २९/०४/२०२१ रोजीच्या वितरणासाठी अंदाजे ३०,००० इतका साठा वितरणासाठी उपलब्ध होणं अपेक्षित आहे, अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा