कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध अशी व्यवस्था उभी केली आहे, तशीच व्यवस्था राज्य सरकारने देखील उभी करायला हवी. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे कान उपटले.
नाशिक येथील सिव्हिल रूग्णालयास भेट दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य व केंद्रामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव नाही. केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली आहे. त्याच आधारे लसींपासून आरोग्य व्यवस्थेतील सर्व गरजा केंद्राकडून प्राधान्यक्रमाने भागवण्यात येत आहेत.
तशीच व्यवस्था राज्य सरकारने देखील उभारली पाहिजे. सध्याच्या स्थितीत आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार या संकटसमयी आपण जनतेच्या पाठिशी उभं राहायला हवं. कुणी कुणाकडे बोट दाखवणं योग्य नाही, आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा आपण योग्य वापर करायला हवा.
हेही वाचा- राज्यातील लसीकरणासाठी राष्ट्रवादीची २ कोटींची मदत
कल्पना करा की, भारताला लसी आयात कराव्या लागल्या असत्या, तर काय स्थिती असती? भारताने स्वत:ची लस तयार केली, ही खूप मोठी उपलब्धी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 29, 2021
एकदम सर्व लस उपलब्ध होणार नसल्याने प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल.
अमरावती येथे माध्यमांशी साधलेला संवाद...#FightAgainstCoronaVirus #Maharashtra pic.twitter.com/SzQeNQngps
कल्पना करा की, भारताला लसी आयात कराव्या लागल्या असत्या, तर काय स्थिती असती? भारताने स्वत:ची लस तयार केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. एकदम सर्व लस उपलब्ध होणार नसल्याने प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल. संपूर्ण देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केलं. आता १ मे पासून १८ ते ४५ हा वयोगट सुद्धा पात्र झाला. कोविशील्डच्या मे अखेरपर्यंत १० कोटी, कोवॅक्सिनच्या ३ कोटी, तर ऑगस्टपर्यंत ६ कोटी लसी येत आहेत.
देशात सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला झाला आहे. पहिल्याच खेपेत केंद्राकडून ११०० व्हेंटिलेटर महाराष्ट्राला देण्यात आले. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्रालाच देण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नुकताच अमरावती जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. तिथं रेमडेसिवीर वाटप आणि लसीकरण याची कमतरता आहे. राज्याला मिळणार्या एकूण लसींचं प्रत्येक जिल्ह्यात समप्रमाणात वाटप व्हावं.
मुंबईसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर आजही १५ टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे चाचण्या वाढविणं, हेच त्यावरील उत्तर आहे. मृतांच्या आकड्यांचे रिकन्सिलिएशन तातडीने झालं तरच स्पष्ट चित्र समोर येईल आणि त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्याची प्रभावी योजना करता येईल, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
(opposition leader devendra fadnavis comment on covid 19 vaccination in maharashtra)
हेही वाचा- तर, १ मे रोजी तरूणांना लस मिळू शकेल, राजेश टोपे यांचे संकेत