Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

तर, १ मे रोजी तरूणांना लस मिळू शकेल, राजेश टोपे यांचे संकेत

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे रोजी अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील काही नागरिकांना लस देता येऊ शकेल.

तर, १ मे रोजी तरूणांना लस मिळू शकेल, राजेश टोपे यांचे संकेत
SHARES

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर १ मे रोजी अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. सद्यस्थितीत आपल्याकडे अतिशय नाममात्र स्वरूपात लस उपलब्ध आहेत. त्यामुळे नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी येण्याचा मेसेज मिळेल, त्यांनाच लस मिळू शकेल. सुरुवातीला या वयोगटासाठी जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. लसीच्या उपलब्धतेनुसार त्याचा विस्तार करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh ) यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, आपल्याकडे १३ हजार लसीकरण केंद्र, रुग्णालय आणि इतर केंद्र आहेत. आपण सद्यस्थितीत दिवसाला साडेपाच लाख लोकांचं लसीकरण करत आहोत. आठवड्याला ५० ते ६० लाख लसीचे डोस मिळाले, तर आपण दिवसाला ८ लाख लोकांचं लसीकरण करू शकतो. आपण ते करूनही दाखवलं आहे. शिवाय आपली लसीकरण क्षमता आपण १३ लाख लसीकरणापर्यंत वाढवू शकतो.

हेही वाचा- जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता? 

परंतु केंद्राकडून लसींचा अत्यंत मर्यादीत पुरवठा होत आहे. राज्य सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला पत्र लिहून लसींच्या उपलब्धदेविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार सीरमने मे महिन्यात १३ ते १४ लाख कोविशील्ड लसीचे डोस, तर भारत बायोटेकने ४ ते साडेचार लाख कोव्हॅक्सिन लसीचे डोस देता येईल, असं सांगितलं आहे. दोन्ही लसींची एकत्रित संख्या १८ लाखांपर्यंत जाईल. हाती लस असल्यावर आपल्याला १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करता येऊ शकेल. परंतु हे लसीकरण अत्यंत कमी केंद्रावरच सुरू ठेवावं लागेल, नाहीतर लस लवकर संपू शकेल, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

त्यातही ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. त्या नागरिकांना लसीचा डोस द्यावाच लागेल. यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचं प्राधान्यक्रमाने लसीकरण करावं लागेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

(health minister rajesh tope on 1st may covid 19 vaccination drive for youth)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा