Advertisement

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दर केले कमी!

सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशील्ड लसी पाठोपाठ आता भारत बायोटेक या कंपनीने भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या कोव्हॅक्सिनचे दर देखील कमी केले आहेत.

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे दर केले कमी!
SHARES

सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशील्ड लसी पाठोपाठ आता भारत बायोटेक या कंपनीने भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या कोव्हॅक्सिनचे दर देखील कमी केले आहेत. कंपनीने या आधी जाहीर केलेल्या दरांमध्ये २०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा दर जाहीर केला होता. त्यानुसार कंपनीकडून केंद्र सरकारला ही लस प्रति डोस १५० रुपयांना, राज्य सरकारांना ६०० रुपये तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपये प्रति डोस या किमतीला देण्यात येणार होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात केंद्रासह राज्य सरकारांचा आर्थिक डोलारा ढासळल्याने या किंमती कमी करण्याची विनंती केंद्राकडून दोन्ही कंपन्यांना करण्यात आली होती. 

हेही वाचा- सीरम इन्स्टिट्यूटनं कोविशील्डचे दर कमी केले, आता इतक्या किंमतीत लस मिळणार

त्यानुसार भारत बायोटेकने एक पत्रक प्रसिद्ध करत कोव्हॅक्सिनच्या किंमतीत कपात करत असल्याची माहिती दिली आहे. या पत्रकात भारत बायोटेकने म्हटलं आहे की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही आता कोव्हॅक्सिन ही लस राज्य सरकारांना ४०० रुपये प्रति डोस या किमतीने देणार आहोत. राज्य सरकारांसाठी हा माेठा दिलासा ठरणार आहे. तर, खासगी रुग्णालयांना मात्र या लसीसाठी १२०० रुपये प्रति डोस हीच किंमत मोजावी लागणार आहे.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने बुधवारीच आपल्या कोविशिल्ड लसीचे दर कमी केले. या नव्या दरांनुसार कोविशील्ड लस आता राज्य सरकारांना ३०० रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे.  

या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारांना आता थेट कंपन्यांकडून लस विकत घेता येईल. परंतु केंद्र सरकारला ही लस केवळ १५० रुपयांना तर राज्यांना महाग का? असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत होता. तसंच लसीची किंमत कमी करण्याची मागणीही केली जात होती.

(bharat biotech cuts rate of covaxin vaccine by 200 rupees for state government)

हेही वाचा- मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद, महापालिकेची माहिती


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा