नवे महापौर राणीच्या बागेत

 Pali Hill
नवे महापौर राणीच्या बागेत
नवे महापौर राणीच्या बागेत
See all

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवास्थानाची जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लवकरच महापौरांना आपले वास्तव्य हलवावे लागणार आहे. आता महापौरांचे निवासस्थान हे राणीबागेत हलवले जाणार असून त्यातील दोन पैकी एका बंगल्यात महापौरांचे निवासस्थान बनवले जाणार आहे. महापौरांचे निवासस्थान हे राणीबागेत हलवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता, त्याप्रमाणे ते तिथे हलवले जाईल. याची जागा लवकरच निश्चित केली जाईल, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना स्पष्ट केलं.

विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांची मुदत 9 मार्च 2017 रोजी संपत असून त्यांनंतर 10 मार्च रोजी नवीन महापौरांची निवड केली जाणार आहे. राणीबागेत नवीन वस्तूची डागडुजी करण्यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे नवीन महापौर थेट राणीबागेत राहायला जाणार आहेत.

Loading Comments