Advertisement

सहाराला विकास आराखड्याचा 'सहारा'?


सहाराला विकास आराखड्याचा 'सहारा'?
SHARES

ओशिवरा येथील भराव केलेली सुमारे 500 एकरच्या जमिनीवर 'ना विकास क्षेत्र' असे आरक्षण टाकून प्रशासनाने सहारा कंपनीला मदत केल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. या जागेवर पूर्वी नैसर्गिक क्षेत्र असे आरक्षण होते. परंतु 'ना विकास क्षेत्र' केल्यामुळे त्यांना 15 टक्के बांधकाम करता येणार आहे. त्यामुळे असे आरक्षण टाकून सहाराला एक प्रकारे मदतच केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

परवडणारी घरे हवीत

मुंबईच्या प्रारूप विकास आराखड्यातबधवार पार्क येथे सेंट्रल पार्कचे आरक्षण टाकण्यात आले आहे. परंतु सेंट्रल पार्क हे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे. ते दक्षिण मुंबईत नसावे. त्यामुळे हे सेंटल पार्क हे ओशिवरा येथे भराव करण्यात आलेल्या सहाराच्या जागेत करण्यात यावे, अशी मागणी रवी राजा यांनी केली.
सहाराच्या 500 एकर जागेवर 'ना विकास क्षेत्र' असे आरक्षण टाकण्यात आल्यामुळे त्या ठिकाणच्या 15 टक्के जागेवर बांधकाम करता येणार आहे. त्यामुळे 15 टक्के जागेवर परवडणारी घरे बांधण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. ज्यायोगे तिथे सेंट्रल पार्कही होईल आणि मुंबईकरांना परवडणारी घरेही प्राप्त होतील.

मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये सीआरझेड 3 चे आरक्षण टाकण्यात आले आहे. हे आरक्षण टाकल्यामुळे येथील मोकळ्या जागांवर समाजकल्याण केंद्र, व्यायामशाळा आदींसह 15 टक्के बांधकाम करता येणार आहे. त्यामुळे असे झाल्यास येथील मोकळ्या जागा शाबूत राहतील आणि कोळीवाड्यांचे अस्तित्व टिकले जाईल, असे त्यांनी सांगितले.
विकास आराखड्यात परवडणारी घरे बांधण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. परंतु, ती एफएसआय वाढवून देऊन मिळवण्यापेक्षा म्हाडाच्या अधिनियमात बदल अत्यल्प, अल्प आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची घरे बांधली जावी, अशी सूचना त्यांनी केली. जेणेकरून मुंबईला 10 लाख घरे उपलब्ध होतील. मिठागराच्या जागेवर घरे बांधण्याची गरज नसून त्यावर घरे बांधण्यास आपला विरोध असल्याचे राजा यांनी सांगितले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा