Advertisement

EMI भरण्यास आणखी ३ महिन्यांची मुभा, कर्जही स्वस्त होणार

रिझर्व्ह बँकेने आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आरबीआयने कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे.

EMI भरण्यास आणखी ३ महिन्यांची मुभा, कर्जही स्वस्त होणार
SHARES
रिझर्व्ह बँकेने आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आरबीआयने कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल.  आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. 


शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 0.40 टक्के कपात करण्याचीही घोषणा केली. रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.  सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. 

2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं शक्तीकांत दास यावेळी सांगितलं. शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार आहे.

महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. लॉकडाऊनमुळे बाजारातील मागणीत घट आली आहे. संपूर्ण जगाचा प्रवास मंदीच्या दिशेने सुरु आहे, असंही ते म्हणाले.  सर्वच क्षेत्रांना कोरोना व्हायरसमुळं मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचा सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. बाजारातील मागणीतही 60  टक्क्यांची घट झाली आहे, असंही ते म्हणाले.



हेही वाचा -

धक्कादायक! लाॅकडाऊनमध्ये क्षुल्लक कारणांवरून पत्नीला तोंडी तलाक

 
नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 13 हजार 758 जणांवर पोलिसांनी नोंदवले गुन्हे...


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा