'तोडलेलं मंदिर पुन्हा बांधा'

 wadala
'तोडलेलं मंदिर पुन्हा बांधा'
'तोडलेलं मंदिर पुन्हा बांधा'
'तोडलेलं मंदिर पुन्हा बांधा'
'तोडलेलं मंदिर पुन्हा बांधा'
See all

प्रतीक्षानगर - मरीअम्मन देवीचे तोडलेलं मंदिर पुन्हा बांधावं या मागणीसाठी प्रतीक्षानगर ते माटुंगा ऑफिसपर्यंत रहिवाशांनी शुक्रवारी मोर्चा काढला. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत मंदिरापैकी प्रतीक्षानगर मधील मरीअम्मन देवस्थाना होते.

सायन कोळीवाडा विधानसभा आमदार मा. आर. तामिल सेल्वन' ही या मोर्चात सहभागी झाले होते. त्यानंतर हा मोर्चा वॉर्ड अधिकारी 'केशव उबाळे' यांच्या कार्यालयात दाखल झाला. त्यावेळी मंदिराबाबत सर्व मुद्दे स्पष्ट केले आणि रहिवाश्यांना पुन्हा त्याच जागेवर मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ही केली. "आम्हाला न सांगता ५० वर्षापूर्वीचे हे मंदिर तोडले परंतु, मंदिराचे संपूर्ण कायदेशीर कागदपत्र वॉर्ड अधिकाऱ्यांकडे जमा केले असून मंदिर पुन्हा बांधण्यास द्यावे हिच अपेक्षा आहे, असे मंदिरचे पुजारी अरुण देवेन्दर यांनी सांगितले".

Loading Comments