Advertisement

बीएमसीमध्ये ४० जागांसाठी भरती, ८० हजार रुपये वेतन

पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख १९ मार्च २०२१ आहे.

बीएमसीमध्ये ४० जागांसाठी भरती, ८० हजार रुपये वेतन
SHARES

मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या (Assistant Professor) ४० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख १९ मार्च २०२१ आहे.

या विभागात भरणार पदं

विभागाचे नाव                             जागा

१) बधिरीकरणशास्त्र विभाग             २६

२) कान-नाक-घसा विभाग                ०१

३) औषध वैद्यकशास्त्र विभाग           ०६

४) त्वचारोग व गुप्तरोगशास्त्र विभाग  ०१

५) क्ष-किरणशास्त्र विभाग                  ०५

६) रोगप्रति बंधात्मक शास्त्र विभाग      ०१

शैक्षणिक पात्रता :

१) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणं आवश्यक आहे.

२) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/टयूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी :

खुला प्रवर्ग - रु. ३०० + जीएसटी = रु. ३१५

इतर प्रवर्ग - रु. २००  + जीएसटी = रु. २१०

वेतन (Pay Scale) : ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : १९ मार्च २०२१

मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता, लों. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – ४०००२२.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in



हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा