Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

ठाणे महानगरपालिकेत ५२ जागांसाठी भरती

भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे.

ठाणे महानगरपालिकेत ५२ जागांसाठी भरती
SHARES

ठाणे महानगरपालिकामध्ये परिचारिका पदांच्या ५२ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त नर्सिंग कोर्स पूर्ण करून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नाव नोंदणी बंधनकारक शासकीय अथवा निमशासकीय रुग्णालयातील कामाच्या अनुभवास प्राधान्य

वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट]

वेतन  : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे 

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

सूचना -

१) उमेदवाराने अर्ज भरताना शैक्षणिक अर्हतेमधील गुणांची टक्केवारी, अनुभवाचा कालावधी इत्यादी माहिती बिनचूक भरावी. अर्ज भरण्यास चूक झाल्यास अर्ज नाकारण्यात येईल.

२) अनुभवाची गणना करताना शासकीय/नियमशासकीय, स्थानिक संस्थेकडील कामकाजाचा अनुभव हा ६ महिन्यापेक्षा जास्त अनुभवासाठी प्रथम ६ गुण असे धरण्यात येतील. प्रति तीन महिन्यासाठी १.५ असे गुण धरण्यात येईल. तीन महिन्याच्या आतील अनुभव विचारात घेतला जाणार नाही. जास्तीत जास्त गुण हे २० असतील.

३) अनुभवाच्या अटीची पूर्तता करणारे उमेदवार मुलाखतीस नसल्यास नवोदित उमेदवारांची नेमणूक केली जाईल.

४) उमेदवारांना मिळालेले गुण जर समान असतील तर वयाने जेष्ठ उमेदवारास प्राध्यान्य द्रेण्यात येईल. 

५) उमेदवाराने सादर केलेल्या अनुभवाचा दाखला अथवा इतर कोणताही दाखला बोगस आढळुन आल्यास अशा उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकेल व त्याची जबाबदारी संबधित उमेदवारावर राहील.हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा