नौदलात 'या' पदाच्या भरणार २७०० जागा

भारतीय नौदलात ऑगस्ट २०२० च्या तुकडीकरिता ही भरती होणार आहे.

SHARE
भारतीय नौदलात सेलर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जवानांना विविध वस्तू पुरविण्यासह इतर कार्यालयीन कामकाजासाठी असलेली सेलरची २७०० पदं भरली जाणार आहेत. बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी आहे.  इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. 

ऑगस्ट २०२० च्या तुकडीकरिता ही भरती होणार आहे. आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात ५००, तर वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात २ हजार २०० पदे भरण्यात येणार आहेत. दोन्ही विभागातील भरतीसाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसहित ६० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरिष्ठ माध्यमिक भरती विभागात १५ वर्षांची आणि आर्टिफिशिअल अॅप्रेंटिस विभागात २० वर्षांची नियुक्ती असेल. 

 उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील अपडेट उमेदवारांना ई-मेल आणि वेबसाइटद्वारे कळविण्यात येतील. परीक्षेनंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. नियुक्ती संपूर्ण भारतातील कार्यालयांमध्ये दिली जाणार आहे. या पदांसाठी सुरुवातीचे वेतन ४ हजार ६०० रुपये असेल. इच्छुक उमेदवारांनी https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाइटवर अर्ज नोंदणी करायची आहे. हेही वाचा -
 
संबंधित विषय
ताज्या बातम्या