मंडई पुनर्विकासासाठी सत्ताधारक विरूद्ध पालिका


  • मंडई पुनर्विकासासाठी सत्ताधारक विरूद्ध पालिका
  • मंडई पुनर्विकासासाठी सत्ताधारक विरूद्ध पालिका
SHARE

विले पार्ले - दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या तळमजल्यावर असलेल्या मंडईचा पुनर्विकास पालिकेनं रद्द केला आहे. वर्षभरापूर्वीच या मंडईचा पुनर्विकास झाल्याचं कारण देऊन हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला, असे पालिकेकडुन सांगण्यात आलंय. सुमारे ४, ३३१चौरस मीटर भुखंडावर असलेल्या मंडईचा पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या विकासाकरिता दिनानाथ मंगेशकर म्युनिसिपल मार्केट व्यापारी संघ या नावाने नोंदणीकृत असोशिएशन स्थापन करण्यात आली होती.पुनर्विकासाला ७०टक्क्यांहुन जास्त परवानाधारकांनी लेखी सहमती पत्र दिले होते. गेल्यावर्षीच १४ कोटी रूपये खर्च करून दुरूस्ती करण्यात आली होती, त्यामुळे दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते. मराठी नाटकांसाठी असलेले हे नाट्यगृह बंद ठेवल्यामुळे पालिकेला नागरिकांच्या टिकेस सामोरे जावे लागत होते. परत नाट्यगृह बंद ठेवल्यास टिका चालु होतील अशी कारणे आता पालिका देत आहे. तर शिवसेना आणि भाजप मंडई पुनर्विकासासाठी आग्रही असल्याकारणाने सत्ताधारक विरूद्ध पालिका असा वाद रंगण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या