Advertisement

चेंबूरमधल्या प्रत्येक झोपडीचं वीजबिल ५ लाख रूपये!


चेंबूरमधल्या प्रत्येक झोपडीचं वीजबिल ५ लाख रूपये!
SHARES

विकासकाच्या फसव्या आश्वासनला बळी पडल्याने चेंबूरमधील हजारो झोपडीधारकांची वीज शनिवारी रिलायन्सने खंडित केली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या रहिवाशांवर पंख्याविनाच दिवस काढण्याची वेळ आली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात हा प्रकार घडला असून वीज खंडित केल्याने रहिवाशांमध्ये मात्र संतापाची भावना आहे.

विकासकाने 10 वर्षांपूर्वी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात एसआरए अंतर्गत विकास करण्यासाठी रहिवाशांसमोर प्रस्ताव आणला. विकासक आणि झोपडीधारकांमध्ये सहमती झाल्यावर विकासकाने परिसरातील सर्व झोपडीधारकांचे वीज बिल भरण्याचे अश्वासन रहिवाशांना दिले. त्यामुळे तेव्हापासून या परिसरात कोणीही वीजबिल भरत नव्हते. त्यामुळे प्रत्येकी झोपडीधारकाचे वीज बिल हे चार ते पाच लाखांच्या घरात आहे. रिलायन्सकडून अनेकदा वीज बिल आणि नोटिसा पाठवूनही वीज बिल रहिवासी भरत नसल्याने शनिवारी रिलायन्सचे अधिकारी पोलीस फौजफाट्यासह सिद्धार्थ कॉलनी येथे आले. त्यांनी सध्या-अर्ध्या परिसराची वीज खंडित केली, तर काहींची वीज येत्या दोन दिवसातच खंडित करणार आहे. रिलायन्सकडून अशी अचानक कारवाई झाल्याने काही वेळ या परिसरात वातावरण तापले होते. मात्र काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त सकाळपासूनच लावला होता. मात्र अचानक वीज बंद झाल्याने ऐन गर्मीत रहिवाशांना पंख्याविनाच दिवस काढावा लागला. 

रिलायन्सने मागचे बिल विकासकाकडून वसूल करावे आणि यापुढे आमचे बिल सुरू करावे ते आम्ही भरायला तयार आहोत.
- महादु मस्के, रहिवासी

मात्र रिलायन्सचे अधिकारी ऐकायला तयार नसल्याने या उन्हाळ्यात इथल्या रहिवाशांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा