Advertisement

कोरोना निर्बंधांपासून पूर्णपणे दिलासा! ‘या’ तारखेपासून निर्बंध शिथील

केंद्र सरकारनं कोरोना निर्बंधाबाबत मोठी घोषणा केली आहे.

कोरोना निर्बंधांपासून पूर्णपणे दिलासा! ‘या’ तारखेपासून निर्बंध शिथील
SHARES

केंद्र सरकारनं कोरोना निर्बंधाबाबत मोठी घोषणा केली आहे. देशात ३१ मार्चपासून निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. फक्त मास्क आणि सोशल डिस्टसिंगचं पालन करणं बंधनकारक केले आहेत.

सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनी देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात २ हजार ५४२ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार ८७ वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १६ हजार ६०५ झाली आहे.

तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त करताना काही खुलासे केले आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचा दावा केला आहे. पुढील तीन महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते.

पण लसीकरणामुळे रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे अथवा मृत्यूचं प्रमाण खूप कमी असेल. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट आल्यास मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अन्यथा चौथी लाट आली तरी ती सौम्य असेल, असा दावा त्यांनी केला आहे.



हेही वाचा

१२-१४ वयोगटातील मुलांचे लसीकरण आता शाळेत होणार

"मुंबई विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची नामफलक मराठीत करा"

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा