Advertisement

वाद सुशोभीकरणाचा


वाद सुशोभीकरणाचा
SHARES

दादर - केशवसुत उड्डान पुलाखाली रीकामे ठेवण्यात आलेले गाळे सुशोभीकरणासाठी मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव बांधकाम करून बंद करत आहेत. मात्र सुधीर जाधव यांच्या सुशोभीकरणाच्या संकल्पनेमुळे विभागात गर्दीचे प्रमाण वाढेल, असे ममता अंढागळे म्हणाल्या. त्याच बरोबर अपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांना स्टेशनबाहेर धावताना त्रास होईल. तसचे गर्दीचा सामना करताना पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अधिक त्रास होईल, त्यामुळे सुशोभीकरण करा पण शोभेल असे करा असेही ममता अंढागळे यावेळी म्हणाल्या.

तर दुसरीकडे दादर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे . फुलमार्केटमध्ये नागरिकांना चालायलाही जागा नाही. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताचं फळे, फुले, भाज्या, कपडे, खाद्य पदार्थाचे ठेले दिसतात. त्यामुळे नागरिकांना या गर्दीच्या समस्येला सामोरे जावे लागते. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा