भोईवाडा ट्रांझिट कॅम्पच्या दुरूस्तीचा शुभारंभ

 Sewri
भोईवाडा ट्रांझिट कॅम्पच्या दुरूस्तीचा शुभारंभ
भोईवाडा ट्रांझिट कॅम्पच्या दुरूस्तीचा शुभारंभ
भोईवाडा ट्रांझिट कॅम्पच्या दुरूस्तीचा शुभारंभ
See all

लोअर परळ - भोईवाडा येथील ट्रान्झिट कॅम्पमध्ये अनेक वर्षे बिल्डरांच्या नाकर्तेपणामुळे नागरी विकासाच्या दुरुस्तीची कामं महापालिकेला करता येत नव्हती. त्यामुळे इथले रहिवासी त्रस्त झाले होते. मात्र येथील बिल्डराला महापालिकेने चार महिन्यांपूर्वी बडतर्फ केल्यानंतर आमदार अजय चौधरी आणि नगरसेवक नंदकिशोर विचारे यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीनं भोईवाडा ट्रांझिट कॅम्पच्या दुरुस्तीसाठी ९० लाख ९८ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि दुरुस्तीच्या कामाची सुरुवातही करण्यात आली. या वेळी शाखाप्रमुख राजन आबिटकर, भारतीय कामगार सेनेचे भाई जाधव, शाखाप्रमुख सुरेश काळे, योगेश केसरकर, उप शाखाप्रमुख प्रविण फाटक आणि कमिटीचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Loading Comments