सायन कोळीवाड्यात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त


  • सायन कोळीवाड्यात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त
SHARE

कोळीवाडा - फुटपाथवर बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे सायन-कोळीवडा भागातील राहिवासी त्रस्त झाले आहेत. कोळीवाडा हा विभाग वाहन तसेच प्रवाशांनी 24 तास गजबजलेला असतो त्यामुळे फुटपाथवर दुकान थाटून बसणाऱ्या या फेरीवाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना अडचणींचा समना करावा लागत आहे. वारंवार याबद्दल तक्रार करून देखील हे फेरीवाले रस्ता अडवून आपला बाजार मांडतात आणि त्यातच रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना आणि पादचाऱ्यांना जायला जागाच नसते. फेरीवाल्यांना जर बाजार बसवायचाच असेल तर त्यांना एक योग्य जागा देऊन तिथे बाजार बसवावा असे मत स्थानिक नागरिक रुपाली पवार यांनी मांडले.

तर, या अडचणींवर लवकरच योग्य तो निर्णय घेऊन फेरीवाल्यांना त्या जागेवरून हलवले जाईल आणि नागरिकांची ही समस्या लेखी लिहून दिल्यास त्यावर तातडीने तपासणी केली जाईल असे परवाना विभागाकडून सांगण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या