Advertisement

भांडण पालिका आणि विकासकाचं, फटका रहिवाशांना


भांडण पालिका आणि विकासकाचं, फटका रहिवाशांना
SHARES

गेल्या आठ वर्षांपासून चेंबूरच्या कोकणनगर परिसरात कुकरेजा बिल्डरमार्फत एसआरए प्रकल्प सुरू आहे. मात्र आद्यापही याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. याच कोकणनगर परिसरात चरई नाला देखील आहे. पालिकेला या नाल्याची रुंदी वाढवायची असल्याने गेली चार वर्ष पालिका येथील रहिवाशांना माहुल गाव येथे स्थलातंरीत होण्यासाठी सूचना देत आहे. मात्र विकासकाने रहिवाशांना याच ठिकाणी इमारती बांधून याच ठिकाणी घर मिळवून देणार असल्याचे अश्वासन दिले आहे. त्यामुळे एकही रहिवासी या परिसरातून स्थलांतरित झालेला नाही. पावसाळा तोंडावर असताना पालिकेने बुधवारी याठिकाणी नोटीस लावून येत्या चार दिवसात याठिकाणी तोडक कारवाई सुरू करणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही जायचं तरी कुठे? पालिकेने तोडक कारवाई केल्यास काय होईल या भीतीने आम्ही यावेळी गावी देखील गेलो नाही.

- मनसूर शेख, रहिवासी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा