‘आम्ही नाही करणार मतदान’

वांद्रे - खेरनगर आणि गांधीनगर येथील म्हाडा रहिवाशांनी चक्क महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. पण निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यांना का घ्यावा लागला? हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. आम्ही तुम्हाला याचं कारण सांगतो. भिंतींना पडलेले तडे, मोडकळीस आलेले इमारतीचे जिने अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन राहतायेत हे रहिवासी. म्हाडाच्या हाऊसिंग स्टॉकच्या निर्णयामुळे मुंबईतील 56 वसाहतींचा पुनर्विकास लटकलाय.

राजकीय पक्ष काय आणि सरकार काय? निवडणुकापूर्वी फक्त आश्वासनांचं गाजर दाखवलं जातं. पण प्रत्यक्ष मात्र अपेक्षा भंग झाल्याचंच रहिवाशांनी स्पष्ट केलं. तसंच कधी कोणता अपघात झाला तर जबाबदारी कोणाची? असा प्रश्न इथल्या रहिवाशांनी उपस्थित केलाय.

निवडणुका जिंकण्यासाठी एक-एक मत किती महत्त्वाचं असतं याचा अंदाज नक्कीच राजकीय पक्षांना असेल. जर खरचं इथं राहणाऱ्या 3 हजार रहिवाशांनी निवडणुकीत मतच नाही दिलं तर ? नक्कीच याचा परिणाम पालिका निवडणुकांवर होऊ शकतो.

Loading Comments