रिझर्व्ह बँकेत नोटांची अफवा, नागरिकांचा उडाला गोंधळ

 Mumbai
रिझर्व्ह बँकेत नोटांची अफवा, नागरिकांचा उडाला गोंधळ
रिझर्व्ह बँकेत नोटांची अफवा, नागरिकांचा उडाला गोंधळ
See all

मुंबई - जुन्या नोटा बदलून मिळत आहे, अशी चुकीची अफवा स्थानिकांमध्ये पसरली आणि फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इमारतीच्या बाहेर नागरिकांचा एकच गोंधळ उडाला.

नोटबंदीच्या काळात अनेक नागरिकांना सरकारने दिलेल्या मुदतीत नोटा बदलता आल्या नाहीत. त्यामुळे जुन्या नोटा बदलून मिळतील या आशेत असलेल्या अनेक नागरिकांनी बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबाहेर गर्दी केली. मात्र, प्रत्यक्षात त्या रांगा केवळ परदेशी नागरिकांसाठी असल्याचे कळताच स्थानिक नागरिकांचा भ्रमनिरास झाला.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात फक्त परदेशी नागरिकांना त्यांचा पासपोर्ट तपासूनच आत प्रवेश दिला जात होता. चुकीचा संदेश मिळाल्याने आणि स्थानिक बँकेतूनही चुकीची माहिती दिल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे समोर आले.

Loading Comments