Advertisement

२८ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला होणार सुरुवात?

मुंबईसह आजुबाजूच्या परिसरला पावसानं मंगळवारी व बुधवारी चांगलंच झोडपून काढलं.

२८ सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला होणार सुरुवात?
SHARES

मुंबईसह आजुबाजूच्या परिसरला पावसानं मंगळवारी व बुधवारी चांगलंच झोडपून काढलं. यावेळी अनेकांमध्ये हा परतीचा पाऊस असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, बुधवारी पडलेला पाऊस हा मान्सूनचा असल्याचं स्पष्ट झालं. सध्यस्थितीत मुंबईत पावसानं विश्रांती घेतली असून, येत्या २८ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरुवात होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राजस्थानच्या वायव्येस सलग ५ दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील घटक कार्यरत नसतील तर परतीच्या पावसाची तारीख जाहीर केली जाते. भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या आठवड्यात राजस्थानच्या वायव्येस पावसाचे प्रमाण कमी असून आठवड्याच्या मध्यावर नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे.

१७ सप्टेंबर ही पावसाच्या परतीचा प्रवासाची सरासरी तारीख असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवड्यात २ ते ८ ऑक्टोबर या काळात विदर्भाचा काही भाग वगळता इतरत्र पाऊस नसेल. सर्वसाधारणपणे पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर १५ दिवसात पूर्ण होतो.

राजस्थानातून… वारे नैर्ऋत्येऐवजी पूर्वेकडून वाहायला लागले की पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो. राजस्थानातून हा प्रवास सुरु होतो. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा ही परतीच्या पावसाची प्रवासाची रेषा असते. या रेषेच्या वरील भागात म्हणजे उत्तरेला पाऊस थांबतो, तर दक्षिणेला पाऊस सुरु असतो.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा