Advertisement

रिक्षा, टॅक्सी चालकांची मनमानी, आकारलं जातंय दुप्पट भाडं

बंदचा फायदा घेत टॅक्सी आणि रिक्षा चालक दुप्पट भाडे आकारत आहे.

रिक्षा, टॅक्सी चालकांची मनमानी, आकारलं जातंय दुप्पट भाडं
SHARES

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरातील बेस्ट बस सेवा बंद करण्यात आली आहे. पण यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी बेस्ट बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांनी टॅक्सी आणि रिक्षा या सेवांकडे धाव धेतली आहे. 

परिणामी रिक्षा आणि टॅक्सी स्टँडवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. पण या बंदचा फायदा घेत टॅक्सी आणि रिक्षा चालक दुप्पट भाडे आकारत आहे. दादर ते केईएम आणि टाटा हॉस्पिटल या मार्गासाठी शेअर टॅक्सीसाठी १५ ते २० रुपये आकारले जात आहेत. रोज याच मार्गासाठी १० रुपये आकारले जात होते.

तर काही ठिकाणी १० ते २० रुपयाऐवजी ३० ते ४० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे या बंदमुळे प्रवाशांच्या खिशाला देखील कात्री लागत आहे.

या सोबतच टॅक्सी आणि रिक्षा स्टँडवर गर्दी झाली आहे. प्रवाशांना तासभर थांबावं लागत आहे. पण दुसरा काही पर्याय नसल्यानं गर्दी आणि जास्त भाडे आकारले जात असूनही प्रवासी रिक्षा आणि टॅक्सीला गर्दी करत आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र बंदमध्ये (Maharashtra bandh) मुंबई आणि उपनगरामधील मुंबईतील बेस्ट बसची (best bus) सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यासोबतच ठाणे परिवहन सेवा (TMT) बंद राहणार आहे.

वरळी डेपो, वडाळ्यातील प्रतिक्षानगर डेपो आणि अशा बऱ्याच डेपोमधूनबस बाहेर पडल्या नाहीत. बस बंद असल्यानं अनेक प्रवाशांनी डेपोत गर्दी केली आहे.

तर महाराष्ट्र बंदचा (Maharashtra Bandh) परिणाम बेस्टच्या सेवेवर झालेला पाहायला मिळतोच आहे. यासोबतच मालाडच्या मालवणी परिसरात सकाळी एका बसची तोडफोड करण्यात आल्याचं वृत्त आहे. तोडफोड केलेल्या बसची संख्या ९ वर गेल्याची माहिती मिळतेय.

बेस्ट बसची झालेली तोडफोड पाहता बेस्टकडून पोलिस सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांचं संरक्षण मिळाल्यावर नियमित बसेस चालवल्या जातील, अशी माहिती मनोज व्हराडे यांनी दिली आहे.

  


हेही वाचा

मुंबईत बेस्टची बस सेवा बंद, महाराष्ट्र बंदचा परिणाम

Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा