Advertisement

राज्यातील रस्ते अपघाती मृत्यू घटले

गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूचा आकडा ८ टक्क्यांनी घटला आहे.

राज्यातील रस्ते अपघाती मृत्यू घटले
SHARES

दरवर्षी रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मात्र, यंदा वर्षात ३ महिन्यात ३ हजार २६१ सर्वसामान्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं दिलासादायक बाब म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत मृत्यूचा आकडा ८ टक्क्यांनी घटला आहे. दारू पिऊन वाहन चालवणं, रस्ते सुरक्षा नियमांचं पालन न करणं, बेदरकारपणे वाहन चालवणं, चुकीच्या बाजूनं ओव्हरटेक करणं या आणि अशा मानवी चुका ही रस्ते अपघाती मृत्यूची कारणं आहेत.

महामार्गावर केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळं अपघाती मृत्यूचा आकडा कमी होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कोरोना व्हायरसमुळं होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत रस्ते नियमांचं उल्लंघन केल्यानं होणारे मृत्यू अधिक आहेत. राज्यात जानेवारी ते मार्च या काळात ८ हजार ५१ अपघातात ३ हजार २६१ प्रवाशांचा बळी गेला आणि तब्बल ६ हजार ९५६ प्रवासी जखमी झाले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूचा आकडा खालावला आहे. जानेवारी ते मार्च २०१९ मध्ये ९ हजार ७० अपघातात ३ हजार ५५८ प्रवाशांचा मृत्यू आणि ७ हजार ७९५ प्रवासी जखमी झाले होते. मार्च ते मे या ३ महिन्यांत कोरोना व्हायरसमुळं राज्यात ६५१ बळी गेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई शहरातील अपघाती मृत्यूत २६ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे.

यंदा मुंबईत ६१८ अपघातांमध्ये ८६ प्रवासी मृत्युमुखी पडले असून, ६६१ प्रवासी जखमी झाले आहेत. २०१९ मध्ये, ७८७ अपघातांमध्ये ११६ मुंबईकरांना प्राण गमवावे लागले होते. ७५८ प्रवासी जखमी झाले होते.



हेही वाचा -

बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

आता घरातल्या घरात होऊ शकते COVID 19ची चाचणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा