कांदिवलीतल्या रस्त्याचे काम रखडले

 Kandivali
कांदिवलीतल्या रस्त्याचे काम रखडले

कांदिवली - सुभाष लेन सरदार वल्लभ भाई पटेल प्रायमरी शाळेच्या समोरील रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम बंद आहे. रस्त्यावर दगड टाकून ठेवण्यात आले आहेत. या रस्त्याची अक्षरश: चाळण झालीय. त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांना ये-जा करायला त्रास होतोय. पालिका आर साऊथचे उपायुक्त साहेबराव गायकवाड यांनी काम 15 दिवसांत पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे.

Loading Comments