• प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
SHARE

वडाळा - 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताह राबवण्यात येणाराय.

वाढत्या अपघातावर नियंत्रण यावं आणि रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. एस.एस. रेनॉल्डस या पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं जनजगृती रॅली काढण्यात आली.
या वेळी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय.बी.सरोदे, रेल्वे सुरक्षा बल प्रभारी सुधीर शिंदे, हवालदार मंगेश साळवी, कमांडो संतोष गव्हाणे, पोलीस प्रवासी मित्र आदी पोलीस पदाधिकारी आणि कर्मचारी तसंच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या