Advertisement

साकीनाका आग: मी वाचलो पण, भाऊ गमावला, आगीतून वाचलेल्या अखिलेश तिवारीची कहाणी

मी डोळे उघडताच घरात आगीचं रौद्र रूप दिसलं. मी कुठलाच आणि कुणाचाच विचार न करता समोरच्या उघड्या जागेतून बाहेर उडी मारली... अशातऱ्हेने मी वाचलो, पण भानावर येताच भाऊ गमावल्याचं कटू सत्य माझ्या समोर आलं. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या भानू फरसाण दुकानात काम करणारा अखिलेश तिवारी दु:खी अंतकरणाने आपली व्यथा मांडतो.

साकीनाका आग: मी वाचलो पण, भाऊ गमावला, आगीतून वाचलेल्या अखिलेश तिवारीची कहाणी
SHARES

ही घटना आहे रविवारी रात्री ३ ते ३.३० वाजेदरम्यानची... आम्ही सर्व झोपलो होतो. अचानक सर्वत्र धूर पसरला आणि कळलंच नाही नेमकं काय झालं ते? मी डोळे उघडताच घरात आगीचं रौद्र रूप दिसलं. मी कुठलाच आणि कुणाचाच विचार न करता समोरच्या उघड्या जागेतून बाहेर उडी मारली... अशातऱ्हेने मी वाचलो, पण भानावर येताच भाऊ गमावल्याचं कटू सत्य माझ्या समोर आलं. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या भानू फरसाण दुकानात काम करणारा अखिलेश तिवारी दु:खी अंतकरणाने आपली व्यथा मांडतो.

साकीनाका परिसरातील खैराणी रोड इथल्या भानू फरसाण दुकानाला अचानक आग लागली. या आगीत एकूण १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यापैकीच एक म्हणजे २७ वर्षीय महेश तिवारी. या फरसाण दुकानात जवळपास १५ जण काम करत होते.




आग लागल्याचं कळताच निम्मेजण बाहेर पडले. पण, निम्मे आत अडकले होते. त्यात महेश देखील होता. महेशने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा मृत्यू झाला. मला माहीत होतं की, तो अडकला आहे. मात्र, मी काहीच करु शकलो नाही. त्यानंतर मला फुटपाथवरील काही लोकांनी रुग्णालयात आणलं.

- अखिलेश तिवारी, महेश तिवारी यांचा भाऊ

ही आग इतकी भयंकर होती की सर्वजण त्यात जळून खाक झाले होते. त्यामुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं. पण, महेशच्या कपड्यांवरुन मी त्याला ओळखलं, असं तिवारी यांनी सांगितलं.

या घटनेत अखिलेश यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाली असून पायांना फ्रॅक्चर झालं आहे. तसंच काही प्रमाणात मुका मार देखील लागला आहे.



हेही वाचा-

साकीनाका दुघर्टनेची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा