Advertisement

एसबीआय खातेदारांची माहिती लीक झाल्याची भीती


एसबीआय खातेदारांची माहिती लीक झाल्याची भीती
SHARES

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक एसबीआयच्या ग्राहकांचा संवेदनशील डेटा गहाळ झाल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे लाखो खातेदारांची माहिती लीक झाल्याचं शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एसबीआय क्वीक नावाच्या एका सेवेसाठी वापरण्यात येणारा सर्व्हर हा असुरक्षित होता. यामुळेच खातेदारांची माहिती लीक झाल्याचं उघड झालंय.  


एसबीआय क्वीक म्हणजे काय

एसबीआय क्वीक हा बँकिंग सेवेचा एक भाग असून याद्वारे ग्राहक बँकेबाबतची कोणतीही सामान्य माहिती मेसेज किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकतात. एसबीआय क्वीक - मिस्ड कॉल बँकिग ही मोफत सेवा असून तुम्ही तुमचा बॅलन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एसएमएस किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकता. विशेष म्हणजे ही एसबीआय क्वीक ही सेवा थेट ग्राहकांच्या मोबाइल फोनशी संलग्न आहे.

कशी झाली लीक?

टेकक्रंच या अमेरिकेतील टेक वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार, मुंबईतील एसबीआय क्वीक सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व्हरला पासवर्ड देण्यात आले नव्हते. त्यामुळे हे सर्व्हर कुणीही नियंत्रित करू शकत होते. यामुळे अनेक हॅकर्सनं याचा गैरफायदा घेत या सर्व्हरमधील हजारो ग्राहकांची महत्त्वाची माहिती लीक केल्याची भीती व्यक्त होत आहे. यात बँक बॅलन्स, खाती क्रमांक याच्यासहीत काही महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय आहे. त्याशिवाय हे सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होतं याची मात्र अद्याप माहिती मिळू शकली नाही. तसंच सर्व्हरमधून लीक झालेला डेटा वापरत खात्यातील पैशांची अफरातफर होण्याची भीती व्यक्त होत आहे.



हेही वाचा

गँगस्टर रवी पुजारी अटकेत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा