गँगस्टर रवी पुजारी अटकेत


गँगस्टर रवी पुजारी अटकेत
SHARES

गँगस्टर रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल इथून अटक करण्यात आली आहे. इंटरपोलनं डीआयसीच्या मदतीनं ही अटकेची कारवाई केली आहे. तपास यंत्रणांनी रवी पुजारीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता त्याच्या प्रत्यार्पणासाठी सेनेगेलसोबत चर्चा सुरू आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या रवी पुजारीला २२ जानेवारीला अटक करण्यात आल्याची माहिती तपास यत्रणांनी दिली. त्याच्या अटकेची माहिती २६ जानेवारीला भारतीय दुतावासाला देण्यात आली. रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.            

रवी पुजारी ऑस्ट्रेलियाला राहत असल्याचा पोलिसांना संशय होता. भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत रवी पुजारीवर लक्ष ठेवून होत्या. पण तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फा सोमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होते.

रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलं आहे. मात्र कालांतरानं कुणाशीही न जमल्यानं त्यानं दोन दशकांपूर्वी स्वत:ची टोळी उभी केली. मुंबईत दहशत निर्माण करण्यासाठी त्यानं पहिल्यांदा बॉलिवूडला टार्गेट केलं. दिग्दर्शक महेश भट यांच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. जानेवारीतच मुंबई पोलिसांनी रवी पुजारीच्या दोन हस्तकांना अटक केली होती. विलिअम रॉड्रिक्स आणि आकाश शेट्टी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांवर मुंबई पोलिसांनी या वर्षातला पहिला मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.हेही वाचा

'संधी'साधू! २६ कोटींचे डायमंड चोरून चोर शिरला युपीतील कुंभ मेळ्यात

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी 'अशी' लढवली शक्कल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा