घोटाळेबाजांना कंत्राटं नाहीत - आयुक्त

 Pali Hill
घोटाळेबाजांना कंत्राटं नाहीत - आयुक्त

मुंबई - महापालिकेकडून रस्ते घोटाळ्यातील ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना कामं देण्यात आल्याचा आरोप होतोय. हा आरोप बुधवारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीत फेटाळला. ब्लॅक लिस्टेट कंत्राटदारांना कामं देण्यात आलेली नसून यापुढे पालिकेचं कोणतंही काम अशा कंत्राटदाराला देणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.

रस्ते घोटाळ्यात सहा कंत्राटदार दोषी आढळलेत. त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलीये. त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची 908 कोटींची रक्कमही पालिकेकडेच राहील. तसंच रस्ते घोटाळ्यातील दहा कंत्राटदारांना देण्यात आलेली कामं जुनीच आहेत, असं स्पष्टीकरण आयुक्तांनी दिलंय.

दरम्यान मुंबईतले 1 हजार 4 रस्ते चकाचक करण्याचा निर्णयही महापालिकेनं घेतलाय. त्यानुसार या रस्त्यांच्या कामांसाठी वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलीय. मात्र एकाचवेळी वाहतुकीच्या कारणामुळे ही सर्व कामं सुरू करता येत नाहीत. त्यामुळे टप्प्याटप्प्यात ही कामं करण्यात येतील.

Loading Comments