मुंबई आणि ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीचा विकास झपाट्याने होत आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्व योजना राबवण्याचे निर्देश दिले.
तसेच भविष्यात कल्याण-डोंबिवली परिसराची पाण्याची गरज भागवता यावी यासाठी महापालिका, जलसंपदा विभाग आणि इतर यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कल्याण शहरात नवीन बांधकामे वेगाने सुरू असून या वाढत्या भागाला पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून सध्या दिले जाणारे अतिरिक्त पाणी नियमित करण्यात यावे.
एमआयडीसीनेही उद्योगांना पुनर्वापर केलेले पाणी पुरवठा करावा आणि महापालिकांना चांगले पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन या भागासाठी प्रस्तावित केलेल्या बंधाऱ्यांचे काम जलदगतीने करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावातील रहिवाशांना कंत्राटी तत्वावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कायम करण्याची कार्यवाही करावी. या गावातील अनधिकृत बांधकामांना क्लस्टरचा दर्जा देऊन नियमित करण्याचा प्रस्ताव पाठवावा, असेही ते म्हणाले.
यासोबतच कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा जलद पुनर्विकास करून ठाणे शहराच्या धर्तीवर क्लस्टर करून त्यांचा विकास करण्याची पावले उचलावीत. डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयाचा प्रश्न सोडवून विद्यार्थी आणि शिक्षकांना न्याय देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले.
हेही वाचा