Advertisement

EXCLUSIVE : जुगार खेळताना सेलिब्रिटींची मुले सापडली

'सी प्रिन्सेस' हाॅटेलमध्ये उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुले जुगार खेळत असल्याची माहिती समाजसेवक मुसा शेख यांना मिळाली होती. त्यांनी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी प्रिन्सेस हाॅटेलवर कारवाई करत १३३ जणांना ताब्यात घेतले.

EXCLUSIVE : जुगार खेळताना सेलिब्रिटींची मुले सापडली
SHARES

जुहूतल्या 'सी प्रिन्सेस' या पंचतारांकित हाॅटेलमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर सोमवारी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १३३ तरूण, तरूणींना ताब्यात घेतलं अाहे. हे सर्व जण उच्चभ्रू वस्तीत राहणारी सेलिब्रिटींची मुले आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांचा मुलगा जिशान सिद्धीकी याचाही समावेश असल्याचं तक्रारदार समाजसेवक मुसा शेख यांनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी ही कारवाई केल्याची सांगत यामध्ये बाबा सिद्धीकी यांच्या मुलाचा समावेश नसल्याचं सांगितलं अाहे. 



समाजसेवकाची तक्रार

'सी प्रिन्सेस'  हाॅटेलमध्ये उच्चभ्रू वस्तीत राहणारी मुले जुगार खेळत असल्याची माहिती समाजसेवक मुसा शेख यांना मिळाली होती. त्यांनी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी प्रिन्सेस हाॅटेलवर कारवाई करत १३३ जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये ६३ मुले, ५२ मुली अाणि १८ गेम व्यवस्थापकांचा समावेश आहे. ही मुले शहरातील व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेत्यांची असल्याचं चौकशीत समोर अालं अाहे.  


या हाॅटेलमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती मला रात्री अडीचच्या सुमारास सूत्रांकडून कळाली. त्यानुसार मी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या नियंत्रण कक्षावर तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत १३३ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांच्या मुलाचाही समावेश आहे. 

- मुसा शेख, तक्रारदार



हेही वाचा - 

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी जेरबंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा