Advertisement

लोणावळ्याला फिरायला जाताय? मग 'हे' वाचाच

पावसाळ्यात भटकंती करण्याची इच्छा होतेय. विकेंडला कुठेतरी जाऊन धम्माल करायची, असा जर काही बेत आखत आहात? मग त्याआधी ही बातमी वाचाच.

लोणावळ्याला फिरायला जाताय? मग 'हे' वाचाच
SHARES

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसंच, वाहनांना धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात बंदी घालण्यात आली आहे.

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून नागरिक गर्दी करत असल्याचं निदर्शनास आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्यामुळे आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

पावसाळ्यात हजारोच्या संख्येनं पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. नियमांची एैशीतैशी करून पर्यटक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचताच. कोरोनाची दुसरी लाट ओसरली, पण तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये, नियमांचे पालन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच केलं होतं. पण, त्यांच्या या आवाहनांकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं.

लोणावळ्यात शनिवार आणि रविवार रोजी तर हजारो पर्यटक दाखल होतात. लोणावळ्यातील पर्यटनस्थळी याच पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आला आहे. पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.

त्याचबरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलं आहे.

दरम्यान भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील.


 हेही वाचा

राज्यात पर्यटनविकासासाठी २५० कोटींचा निधी वितरणाचे निर्देश

मलबार हिलवर लवकरच घेता येईल जंगल सफारीचा आनंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा