Advertisement

मुंबईत 18 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू

मुंबई पोलिसांनी परिपत्रकही जारी केले आहे.

मुंबईत 18 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू
SHARES

मुंबईत पुढील महिन्यापर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबईत बुधवारी 20 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन वर्षाच्या 18 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रकही जारी केले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आल्याने 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.

याशिवाय सार्वजनिक सभांनाही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार कर्फ्यूच्या काळात शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

कलम 144 मध्ये या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे

  • मुंबईत १८ जानेवारीपर्यंत लाऊड स्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी
  • कलम 144 लागू झाल्यामुळे 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल.
  • जमाबंदीच्या काळात एकत्र येण्यावर आणि आंदोलनावर बंदी
  • मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला बंदी
  • न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल
  • मोठ्या आवाजात संगीतावरही बंदी आहे

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.



हेही वाचा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

मुंबईतील जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीसाठी सरकार लवकरच पावले उचलणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा