रेल्वे स्थानकांवर कडक सुरक्षा !

 Mumbai
रेल्वे स्थानकांवर कडक सुरक्षा !
Mumbai  -  

मुंबई - रेल्वे पोलीस आणि आरपीएफकडून परळ, एलफिस्टन आणि वांद्रे अशा महत्त्वाच्या स्थानकांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी परळ स्थानक उडवण्याची धमकी देणारा फोन कंट्रोल रूमला आला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. 

धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून याबाबतची माहिती तात्काळ रेल्वे पोलीस आणि आरपीएफला देण्यात आली. 

मंगळवारी वांद्रे आणि पालघर स्थानकांचीही तपासणी पोलिसांनी केली. लोकलने येणाऱ्या पार्सलची आणि स्थानकांवरील सामान, रेल्वे रूळाची तसेच लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या जनरल बोगी तपासण्यात येत आहेत. रेल्वे लगतच्या झोपडपट्टीतही पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.


Loading Comments