Advertisement

ज्येष्ठांना खूशखबर! महापालिका रुग्णालयात उपचारांसोबत औषधेही मिळणार मोफत!

महापालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारांत सध्या ५० टक्के एवढी सवलत दिली जाते. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांकडून तपासणीसह शस्त्रक्रियेसाठी एकही पैसा घेतला जाणार नाही. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समितीत मंजूर झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

ज्येष्ठांना खूशखबर! महापालिका रुग्णालयात उपचारांसोबत औषधेही मिळणार मोफत!
SHARES

मुंबईतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना महापालिका रुग्णालयांसह दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये मोफत वैद्यकीय उपचारांसोबतच औषधेही मिळणार आहे. स्थायी समितीने नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे महापालिकेच्या मान्यतेनंतर लवकरच सर्व महापालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्या किती सवलत?

महापालिकेच्या रुग्णालय व दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारांत सध्या ५० टक्के एवढी सवलत दिली जाते. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांकडून तपासणीसह शस्त्रक्रियेसाठी एकही पैसा घेतला जाणार नाही. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समितीत मंजूर झाल्यानंतर स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

सर्वपक्षीय पाठिंबा

स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीला आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी या प्रस्तावाचं स्वागत करत केलं. ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत दिल्यावर औषधे घेण्यासाठी त्यांच्या हाती चिठ्ठी ठेवायची का? त्यांनी बाहेरून औषधं विकत घ्यायची का? असा प्रश्न उपस्थित करत जाधव यांनी शस्त्रक्रिया व तपासणीबरोबरच औषधेही मोफत देण्याची मागणी उपसूचनेद्वारे केली.

या मागणीला सर्वच पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपसूचनेसह मूळ प्रस्ताव मंजूर करत ज्येष्ठ नागरिकांना सर्वच प्रकारच्या वैद्यकीय उपचार आणि औषधे मोफत देण्यास परवानगी दिली.

हेही वाचा-

ज्येष्ठांसाठी स्वतंत्र आरोग्य कक्षाची मागणी

हँकॉक पुलाचं काम रेल्वेनेच रोखलं, महापालिकेचा धक्कादायक आरोप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा