Advertisement

कोरोनावरील लसीच्या चाचणीसाठी सिरम कंपनीला पुन्हा परवानगी, पण 'या' आहेत अटी

इंग्लंडमधील एका चाचणीत सामील झालेला स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या.

कोरोनावरील लसीच्या चाचणीसाठी सिरम कंपनीला पुन्हा परवानगी, पण 'या' आहेत अटी
SHARES

ऑक्सफोर्ड विद्यापीठातील कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्यास भारतीय औषध नियंत्रक जनरल (DCGI) डॉ. व्हीजी सोमानी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ला मान्यता दिली आहे.

मंगळवारी डीसीजीआयनं या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) मंजुरी दिली आणि चाचणीसाठी वॉलेंटिरच्या भरतीवरील बंदीचा आदेश मागे घेतला. तथापि, त्यानं कंपनीसमोर काही अटी घातल्या आहेत ज्याचं त्यांना काटेकोरपणे पालन करावं लागेल.

लसीची चाचणी का थांबवली होती?

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या इंग्लंडमधील एका चाचणीत सामील झालेला स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे थांबवण्यात आल्या. अ‍ॅस्ट्रॅजेनेका या लसीच्या परवानाधारक कंपनीनं नियमित अडथले सांगत म्हटलं की, स्वयंसेवकाला झालेला आजार अद्याप समजू शकला नाही. जरी SIIनं प्रथम भारतात त्याची चाचणी थांबवली नाही. परंतु डीसीजीआय कडून नोटीस मिळाल्यानंतर त्यांना चाचणी थांबवावी लागली.


स्वयंसेवकाच्या बंदीचा निर्णय मागे

आजारी स्वयंसेवकांच्या विश्लेषणामध्ये ट्रायल्स सुरक्षित झाल्याचं कळताच शनिवारी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी इंग्लंडमध्ये पुन्हा चाचण्या सुरू केल्या. त्यानंतर भारतातील चाचण्या करण्यास देखील परवानगी मिळाली. त्यानंतर मंगळवारी चाचण्यांसाठी स्वयंसेवकांच्या भरतीवरील बंदी काढून डीसीजीआयनं एसआयआयला पुन्हा चाचणी सुरू करण्यास परवानगी दिली.


'या' आहेत अटी

मंगळवारी डीसीजीआयनं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, भारताच्या डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डानं (DSMB) काही अटींसह चाचणी सुरू ठेवण्याची आणि उर्वरित स्वयंसेवकांची नेमणूक करण्याची शिफारस केली आहे.

चाचणी पुन्हा सुरू करण्यासाठी एसआयआयपुढे ठेवलेल्या अटींमध्ये स्क्रीनिंगच्या वेळी अतिरिक्त काळजी घेणं, संमतीबद्दल अधिक माहिती प्रदान करणं आणि चाचणीदरम्यान प्रतिकूल घटनांचं कठोर निरीक्षण करणं समाविष्ट आहे.

एसआयआयनं अनेक फॉर्म आणि पत्रकं सुधारित आणि पुन्हा सबमिट केली आहेत. डीसीजीआयच्या आदेशानुसार एसआयआयनं स्वयंसेवकांशी संबंधित सुधारित माहिती पत्रक, सुधारित माहिती कॉन्सेट फॉर्म आणि अतिरिक्त सुरक्षा देखरेख योजना इ. सबमिट केली आहे. या व्यतिरिक्त एसआयआयनं डीसीजीआयलाही या लसीच्या डोसनंतर सात दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यास सांगितलं आहे.

चाचणी यशस्वी झाल्यास...?

२ ऑगस्टला डीसीजीआयनं एसआयआयच्या लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्याला मान्यता दिली. या चाचणीत, या लसीची चाचणी देशातील १७ वेगवेगळ्या ठिकाणातील कमीतकमी १८ ते ५५ वयोगटातील १ हजार ६०० निरोगी स्वयंसेवकांवर करण्यात आली.

भारतात या लसीला कोविशिल्ट असं नाव देण्यात आलं आहे. नोव्हेंबरपर्यंत या चाचण्या पूर्ण होतील. चाचणी यशस्वी झाल्यास ती लवकरच बाजारात येऊ शकते.हेही वाचा

आॅक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचा महापालिका घेणार शोध

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा