Advertisement

दादरमध्ये बेस्ट बसच्या अपघातात ७ जण जखमी, पहा व्हिडिओ

बुधवारी सकाळी दादर टीटी इथं बसनं डंपरला धडक दिली.

दादरमध्ये बेस्ट बसच्या अपघातात ७ जण जखमी, पहा व्हिडिओ
SHARES

बुधवारी सकाळी दादर टीटी इथं बसनं डंपरला धडक दिली. यामध्ये बेस्ट बसचा चालक आणि वाहक यांच्यासह सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यानं एका वृत्तसंस्थेला दिली.

तेजस्विनी बस मरोळ ते पायधोनी या मार्ग क्रमांक २२ वरून प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी हा दादर इथं हा अपघात झाला.

सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की, सात जणांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. दाखल झालेल्यांपैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. तर चार जणांना किरकोळ जखमा आहेत.

डीन डॉ मोहन जोशी यांनी सांगितलं की, ड्रायव्हर आणि कंडक्टरला गंभीर दुखापत झाली आहे. "वाहन चालकाच्या यकृताला दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आले आहे." 

कंडक्टरचीही बरगडी फ्रॅक्चर झाल्याचं त्यांनी सांगितलं. तिसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला आणि मानेला फ्रॅक्चर झाला आहे. या सर्वांची प्रकृती गंभीर असून त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं, असं जोशी यांनी सांगितलं.

उर्वरित चौघांना किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांना निरिक्षणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की, जवळपास सर्वांच्या डोक्याला आणि छातीला पुढच्या भागात जखमा होत्या. त्यांना तपासण्या आणि स्कॅनसाठी नेण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. दुरुस्तीसाठी  नेण्यात आलं आहे.

खालील व्हिडिओतील दृष्ट्य विचलित करू शकतात...
हेही वाचा

झोपाळ्यावर खेळताना ८ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

खोदलेल्या खड्ड्यात चिमुरडे पडले, दोघांचा बुडून मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा