Advertisement

खोदलेल्या खड्ड्यात चिमुरडे पडले, दोघांचा बुडून मृत्यू

मुंबईच्या अँटॉप हिल भागात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. आई वडिलांनी यासाठी पालिकेला जबाबदार धरलं आहे.

खोदलेल्या खड्ड्यात चिमुरडे पडले, दोघांचा बुडून मृत्यू
SHARES

मुंबईच्या अँटॉप हिल भागात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे दोघा मुलांना प्राण गमवावे लागले. मुंबईच्या अँटॉप हिल भागात सीजीएस कॉलनी सेक्टर 7 मध्ये ही घटना घडली.

सोमवारी संध्याकाळी दोन्ही मुलं तिथल्या मैदानात खेळत होती. यावेळी पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये दोन्ही मुलं अचानक पडली. खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्या पाण्यातच बुडून दोघांचा जीव गेला.

मुलं खड्ड्यातील पाण्यात पडल्याचा प्रकार लक्षात येताच दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यांना जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. परंतु डॉक्टरानी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. यापैकी एक जण नऊ वर्षांचा, तर दुसरा अकरा वर्षांचा होता.

पाईपलाईन दुरुस्तीचे काम करताना सुरक्षिततेच्या योग्य त्या उपाययोजना केलेल्या नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेसंदर्भात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे.

अधिका-यांनी सांगितले की या भागात पाण्याची पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू होते. प्रकल्पाचा एक भाग म्हणून एक खड्डा खोदून तो पाण्यानं भरला होता. मात्र, मुलांनी खड्ड्यात उडी मारली की चुकून त्यात पडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

पाण्याच्या पाइपलाइनच्या कामात काही निष्काळजीपणा आढळल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल, असंही अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, ही मुलं घटनास्थळी कशी पोहोचली हे त्यांना माहीत नसल्याचं मृतांच्या कुटुंबियांनी सांगितलं. शिवाय, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकार्‍यांना त्यांच्या निष्काळजीपणासाठी जबाबदार धरलं.

"मला माझ्या मुलासाठी न्याय हवा आहे. ही घटना घडली तेव्हा माझा ११ वर्षांचा मुलगा शिवम खेळत होता," असं मृताच्या वडिलांनी एएनआयला सांगितलं.

"प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मी माझा एकुलता एक मुलगा गमावला आहे. दोषीवर कारवाई झाली पाहिजे," असं आणखी एका मृताच्या वडिलांनी सांगितलं.

अँटॉप हिल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.



हेही वाचा

झोपाळ्यावर खेळताना ८ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू

मुंबईत तब्बल ३ लाखांची मॅनहोल झाकणे चोरीला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा