Advertisement

मुंबईत तब्बल ३ लाखांची मॅनहोल झाकणे चोरीला

महापालिका प्रशासनानं स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे २० ते २५ झाकणे चोरीला गेली असून त्यांची किंमत अंदाजे अडीच ते ३ लाख रुपये इतकी आहे.

मुंबईत तब्बल ३ लाखांची मॅनहोल झाकणे चोरीला
SHARES

मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणं चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणं चोरीला गेली आहेत. दरम्यान, मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणं चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याची माहिती समोर येत आहे.

त्यासंदर्भात महापालिका प्रशासनानं स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे २० ते २५ झाकणे चोरीला गेली असून त्यांची किंमत अंदाजे अडीच ते ३ लाख रुपये इतकी आहे.

पश्चिम उपनगरात पालिकेच्‍या के/पूर्व विभागांतर्गत अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व व जोगेश्‍वरी पूर्व परिसरात मलनिस्सारण वाहिन्यांचं जाळं उभारण्‍यात आलं आहे. स्वच्छता व नियमित तपासणी करण्यासाठी वाहिन्यांना ठराविक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकण बसवण्यात आली आहेत.

प्रत्येक वाहिनी १५ ते २५ फूट खोल असल्‍यामुळे चांगली सुरक्षितता असावी यासाठी मॅनहोलची झाकणं ही लोखंडी आणि मजबूत स्वरूपाची असतात. एका झाकणाची किंमत अंदाजे १२ हजार रुपये इतकी आहे. झाकणं चोरीचे प्रकार वाढल्यानं अखेरीस संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याआधारे अंधेरी एमआयडीसी व सहार पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या वतीनं देण्यात आली.

के/पूर्व विभागात वेगवेगळ्या परिसरात असलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील लोखंडी झाकणांना चोरट्यांनी लक्ष्‍य बनविले आहे. मागील काही दिवसांपासून अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात मिळून सुमारे २० ते २५ झाकणे चोरीला गेली आहेत. विशेषतः अंधेरी एमआयडीसी परिसरात अधिक संख्येनं झाकणं चोरीला गेली आहेत. या झाकणांची चोरी पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा