Advertisement

हार्बर मार्गावर पुढील २२ दिवस ब्लॉक, जाणून घ्या नवं वेळापत्रक

11 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्‍टोबर 2023 पर्यंत काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील.

हार्बर मार्गावर पुढील २२ दिवस ब्लॉक, जाणून घ्या नवं वेळापत्रक
(File Image)
SHARES
मध्य रेल्वेने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी आज, सोमवारपासून २ ऑक्टोबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 

मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) ते ग्रेटर नोएडातील दादरीपर्यंत समर्पित मार्गिका उभारण्यात येणार आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून पनवेल स्टेशन यार्डमध्ये दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. यासाठी लोकल पार्किंग मार्गिकांमध्ये बदल करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

स्थानक : पनवेल
यार्ड वेळ : रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत
कालावधी : ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

शेवटची लोकल
रात्री १०.५८ : सीएसएमटी-पनवेल
रात्री ११.३२ : ठाणे-पनवेल

रात्री १०.१५ : पनवेल-ठाणे

पहिली लोकल
सकाळी ४.३२ : सीएसएमटी-पनवेल
सकाळी ५.४० : पनवेल-सीएसएमटी
सकाळी ६.२० : ठाणे-पनवेल
सकाळी ६.१३ : पनवेल-ठाणे

रद्द लोकल फेऱ्या
सीएसएमटी-पनवेल : रात्री ११.१४, १२.२४, पहाटे ५.१८, सकाळी ६.४०
पनवेल-सीएसएमटी : रात्री ९.५२, १०.५८, पहाटे ४.०३, ५.३१
ठाणे-पनवेल-नेरुळ : रात्री ९.३६, १२.०५, पहाटे ५.१२, ५.४०
पनवेल-ठाणे : रात्री ११.१८, पहाटे ४.३३, ४.५३

अंशत: रद्द
रात्री : ११.३०, ११.५२, १२,१३,१२.४० सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील.



हेही वाचा

'मुंबई दर्शन'साठी नवीन ओपन डेक असलेल्या बस बेस्ट खरेदी करणार

जादा शुल्क आकारणाऱ्या बसचालकांविरोधात तक्रार करा, व्हॉट्सअॅप क्रमांक जारी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा