• शाहू नगरमध्ये नाले सफाईला सुरुवात
SHARE

शाहूनगर येथील नाले तुडुंब भरले असून, पालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय अशी बातमी 'मुंबई लाइव्ह'ने काही दिवसांपूर्वी दाखवली होती. अखेर 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीची दखल घेत माहीम शाहूनगर येथील नाले सफाईला सुरुवात करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या नाल्यांची सफाई सुरू करण्याच आली आहे.

शाहूनगर नाल्याची बातमी 'मुंबई लाइव्हनं' 27 एप्रिलला दाखवली होती. त्यांनर जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी एप्रिल अखेरीस अथवा मेच्या पहिल्या आठवड्यात नाले सफाई सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं.एकंदरीत परिस्थिती पाहता नाले सफाईला उशिरा सुरुवात झाली असून, मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात आल्यास नालेसफाईचा बोजवारा उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हेही वाचा - 

नाले भरले तुडूंब,पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष -

संबंधित विषय
ताज्या बातम्या