Advertisement

डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करा दे...!


डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करा दे...!
SHARES
Advertisement

मुलुंड - मुंबई पूर्व महामार्गालगत हरी ओम नगर परिसराशेजारीच डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे इथले नागरिक त्रस्त आहेत. या डम्पिंग ग्राउंडची कालमर्यादा आणि येथील कचरा साठवण्याची क्षमता कधीच संपली आहे. परंतु तरीही त्या डम्पिंग ग्राउंडला दुसरी जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. निवडणुका येताच या समस्येवरून अनेक आश्वासने दिली जातात. परंतु समस्येचं राजकारण होण्याखेरीज काहीही निष्पन्न होत नाही. या डम्पिंग ग्राउंडमुळे हरी ओम नगर आणि आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरून आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडवर लवकरात लवकर तोडगा काढणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement