Advertisement

आता शिवभोजन थाळी घरपोच मिळणार

शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता शिवभोजन थाळी घरपोच मिळणार
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नियम कठोक केले असले तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. नियमानुसार, हॉटेल्स बंद आहेत. पण पार्सल सुविधा सुरू आहे. त्यामुळेच शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येणार आहे.

शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनं लागू केलेल्या सर्व नियमांचं पालन जनतेनं करावं आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारनं “ब्रेक द चेन” या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केलं तरच आपण कोरोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केलं.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्यात ४७ हजार २८८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात २६ हजार २५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ टक्के झालं आहे.



हेही वाचा

एपीएमसीमध्ये गर्दी होऊ लागल्याने वेळेत बदल

बेड्स, रूग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा, 'हा' आहे क्रमांक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा